मुंबई : भाईंदर येथे खासगी टॅक्सीचालकाकडून प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आलाय. टॅक्सीचालकासह त्याच्या साथिदाराला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासगी टॅक्सी चालक सुरेश पांडुरंग गोसावी (३२) आणि त्याचा साथीदार उमेश जसवंत झाला (३१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.


काशिमिरा ते ठाणे प्रवास


पीडित तरूणीने १९ डिसेंबर रोजी मिरा-भाईंदरमधील काशिमिरा येथून ठाण्याला जाण्यासाठी खासगी टॅक्सी बुक केली. टॅक्सीत आधीच एक जण होता. शेअर टॅक्सी असल्यामुळे पीडित महिलेला तो सहप्रवासीच वाटला. दरम्यान प्रवासाला सुरुवात होताच चालकाने टॅक्सी ठाण्याकडे न नेता वज्रेश्वरी येथे नेली. 


दागिने काढून बलात्कार


टॅक्सी चालक आणि टॅक्सीतील दुसऱ्या तरुणाने पीडित तरूणीचे दागिने काढून घेतले आणि बलात्कार केला. त्यानंतर महिला तेथे सोडून देण्यात आले. वज्रेश्वरी येथून दोघांनी पळ काढला. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली


पोलीस कोठडी


पीडितेच्या तक्रारीवरून चालक गोसावी आणि झालावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यालायलायाने त्यांना पोलीस कोठडी ठोवली आहे.