मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रिलायन्सच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुरूवातीला ही रूटीन चेकअप असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. रश्मी ठाकरे यांची २३ मार्चला कोविड १९ संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आली होती. तसेच आदित्य ठाकरे यांची कोव्हिड चाचणी देखील पॉझिटीव्ह आली होती.