मुंबई : टाटा ग्रुपचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईतील 18 वर्षांच्या अर्जुन देशपांडेच्या औषध विक्री करणाऱ्या 'जेनरिक आधार' या कंपनीत गुंतवणूक केल्याचं बोललं जात आहे. ही कंपनी दुकानदारांना कमी किंमतीत औषधं पुरवते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटांनी यामध्ये किती पैसे गुंतवले हे समोर आलेलं नाही. याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही. अर्जुन देशपांडे याने दोन वर्षापूर्वी आपल्या आई वडिलांकडून पैसे घेऊन या कंपनीची सुरवात केली होती. 


अर्जुन देशपांडे यांनी स्वत: ही गोष्ट शेअर केली आहे. पण त्याने टाटांकडून किती पैसे गुंतवण्यात आले हे नाही सांगितलं. त्याने सांगितलं की, रतन टाटा हे मागील 3-4  महिन्यांपासून या प्रस्तावावर विचार करत होते. टाटांना त्यांच्यासोबत पार्टनर बनणायचं होतं आणि हा व्यवसाय चालवण्यासाठी मेंटोर देखील. अर्जुन देशपांडे याने एका वृत्तवाहिनीला माहिती दिली की, सर रतन टाटा यांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. याबाबत लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल.'


सूत्रानुसार, रतन टाटा यांनी यामध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. यामध्ये टाटा ग्रुपचा काही संबंध नाही. याआधी रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅप्टर, क्योरफिट, अरबन लॅडर, लेन्सकार्ट आणि लाइब्रेट सारख्या अनेक स्टार्टअप कंपन्यामध्ये पैसे गुंतवले आहेत.


रतन टाटा यांनी ५० टक्के गुंतवणूक केल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जातं होतं. पण फॅक्ट चेकमध्ये ही माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे.


रतन टाटा यांनी मराठमोळ्या मुलाच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी खरेदी केली का? वाचा सत्य


रतन टाटा यांनी स्वत: यावर ट्विट करत ५० टक्के गुंतवणूक केली नसून काही प्रमाणात गुंतवणूक केल्याचं स्पष्ट केलं आहे.



अर्जुन देशपांडेने दोन वर्षांपूर्वी जेनेटिक आधारची सुरुवात केली होती. आता कंपनीची वार्षिक उलाढाल 6 कोटींच्या घरात पोहोचली आहे. ही एक युनीक फार्मेसी एग्रीगेटर मोडनेस मॉडेलवर काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी उत्पादकांकडून जेनेरिक औषधं खरेदी करुन सरळ दुकानदारांना विकते. यामुळे होलसेलरचं 16 ते 20 टक्के मार्जिन वाचतं.


मुंबई, पुणे, बंगळुरु आणि ऑडिशाचे 30 रिटेलर या कंपनीसोबत जोडलेले आहेत. प्रॉफिट शेअरींग मॉडेल वर चालते. जेनेरिक आधारमध्ये 55 कर्मचारी आहेत. ज्यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजीनियर आणि मार्केटिंग प्रोफेशनल यांचा समावेश आहे.


अर्जुन देशपांडेने माहिती दिली की, एक वर्षाच्या आत त्यांची कंपनी 1000 फ्रेंचायजी मेडिकल स्टोर उघडण्याचा विचार करत आहे. आम्ही आमचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्ली पर्यंत करु.'