मुंबई :  रतन टाटा ज्यांच्याकडे संपूर्ण भारतीय आदराने पाहतात आणि त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करतात. रतन टाटा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. रतन टाटा यांनी एका वेबसाईटच्या फेसबूकपेजवर आपल्या खासगी जीवनातील काही किस्से शेअर केले आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सर्वात आधी सांगता येणारा किस्सा आहे, रतन टाटा यांचं पहिलं प्रेम.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतन टाटा यांनी या ठिकाणी त्यांना एका मुलीसोबत कसं प्रेम झालं. रतन टाटांचा प्रेमाचा मोर्चा कसा लग्नापर्यंत आला, हे त्यांनी अगदी थोडक्यात सांगितलं आहे. 


रतन टाटा यांचं पहिलं प्रेम बहरलं ते लॉस एंजेलिस शहरात, या शहरात त्यांची पहिली नोकरी होती. हे भूतकाळातले दिवस आठवताना रतन टाटा म्हणतात, 'ते दिवस खूपच चांगले होते. तसा तो ऋतूचं सुंदर होता, माझ्याजवळ माझी गाडी होती, आणि माझ्या पहिल्या नोकरीवर माझं प्रेमही जास्तच होतं'.


प्रेमाची पहिली बाजू सांगताना रतन टाटा म्हणतात, 'याचं शहरात रतन टाटा यांना आपलं पहिलं प्रेम भेटलं. रतन टाटा यांना या मुलीवर एवढं प्रेम झालं की ते या विषयी म्हणतात, हे लॉस एंजेलिस होतं, जेथे मला प्रेम झालं, मी त्या मुलीशी लग्न करणार होतो. पण त्याच वेळी मी भारतात येण्याचा निर्णय घेतला कारण माझ्या आजीची तब्येत बरी नव्हती.' 


रतन टाटा यांच्या प्रेमात युद्ध आडवं आलं असं म्हणता येईल, कारण रतन टाटा पुढे यावर म्हणाले, 'मी याचा विचार करून भारतात परतलो की, ज्या मुलीशी माझं लग्न होणार आहे, ती देखील माझ्यासोबत भारतात येईल. पण १९६२ साली भारत-चीन युद्ध सुरू झालं. या भारत-चीन युद्धामुळे तिचे आईवडील तिला भारतात पाठवण्यासाठी राजी नव्हते, आणि हे प्रेम पुढे एका नात्यात बदलू शकलं नाही.'


या बातमीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या


रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?


रतन टाटांनी सांगितली त्यांची प्रेमकहाणी...


रतन टाटा यांच्या आजीसारखी आजी सर्वांना मिळो!