Ratan Tata Passed Away :  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ट्विटवरुन त्यांची प्रकृती चांगली आहे असं सांगण्यात आलं होतं. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली.



रतन टाटांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या आरोग्यासंबंधी काही अफवा पसरत असल्याची मला कल्पना असून, मला प्रत्येकाला त्यात काही तथ्य नसल्याचं सांगायचं आहे. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे.


चिंतेचं कोणतंही कारण नाही. मी एकदम व्यवस्थित असून, लोकांना आणि मीडियाला कोणतीही चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती करतो असं रतन टाटा यांनी सांगितलं आहे.' 


रतन टाटा यांची शेवटची पोस्ट




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रतन टाटा यांची निधनाची बातमी कळताच त्यांनी अत्यंत दु:ख व्यक्त केलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते म्हणाले की, 'रतन टाटा जी यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझं मन भरून आलं आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत आलो आहे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करायचो. मला त्याचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. अत्यंत वेदना झाल्या.' या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.