मुंबई : पिकाला योग्य हमीभाव,कर्जमाफी अशा अनेक मागण्या पूर्ण न झाल्यानं राज्यभरातील शेतकरी हवालदिल झालाय. वेगवेगळ्या मार्गाने तो आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मग कधी घोषणाबाजी, आंदोलन करुन तर कधी रस्त्यावर पिकं फेकून सरकारच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झालायं. 'ही अंत्यत क्लेशदायक घटना आहे. सरकारी मालमत्ता, अन्नाची नासधूस करणाऱ्या अशा शेतकरी आंदोलकांना तुरूंगात टाका' असे ट्विट रवीना टंडन हिनं केलंय. एवढंच नव्हे तर यांना जामीनही देऊ नता असंही तिने पुढे म्हटलं आहे.



रवीनाचं उत्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीनाच्या या भुमिकेमुळे तिच्या ट्विटखाली जोरदार हल्ला चढविण्यात आला. अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली.



'शेतकरी रजेवर गेला तर सर्वांचे हाल होतील,जग उपाशी राहिलं, तुम्ही जे मोफत इंटरनेट वापरण्यासाठी जगूही शकणार नाही' असे रिट्विट एकाने केले. त्यालाही रवीनाने सुनावले. मग मोफत इंटरनेट वापरून तुम्ही काय करताय ? तुम्ही इंटरनेट वापरणं बंद करा आणि अन्नाची नासाडी करणाऱ्यांना समर्थन करण्यापेक्षा मदत कशी करता येईल असा विचार करा' असे तिने सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्यांमागचं गांभीर्य लक्षात न घेता केवळ त्या आंदोलकांना तुरूंगात टाकण्याची एकतर्फी भाषा वापरल्याने रवीना सर्वांच्या रडारवर आहे.