मुंबईः  RBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर आता अर्थ मंत्रालय छोट्या बचत योजनांमध्ये उपलब्ध व्याजदरात वाढ करू शकते. वाढती महागाई आणि महागडे कर्ज यामुळे व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही सुकन्या, समृद्धी योजना किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्येही गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. SSY आणि PPFचे व्याजदर सरकार लवकरच बदलू शकते. असे झाल्यास अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना थेट लाभ मिळेल.



झी बिझनेस डिजिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी बचत योजनांवरील व्याज सध्याच्या दरापेक्षा जास्त असू शकते.


आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांकडून एफडी आणि आरडीचे व्याजदर वाढवले ​​जात आहेत. अशा स्थितीत सरकारी बचत योजनांवरील व्याजदरही वाढण्याची अपेक्षा आहे.


30 जून रोजी अल्पबचत योजनेवरील व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीसाठी केला जाणार आहे. यावेळी सरकारकडून या बचत योजनांवर व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे.



अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. अशा स्थितीत महागाईचा विचार करता त्यावरील व्याज वाढवले ​​जाऊ शकते.


सध्या, PPF वर वार्षिक 7.1 % दराने व्याज मिळते. त्याच वेळी, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.6% वार्षिक परतावा दिला जातो. त्याचप्रमाणे, जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट खात्याबद्दल बोललो, तर त्याचा परतावा 5.8% आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्के आहे.