मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी पुन्हा नोटीस पाठवली आहे. देशमुख यांना शनिवारी ED च्या कार्यालयात हजर व्हायचे होते. परंतु ते उपस्थित राहिले नाही. त्यांच्यावतीने वकीलांनी म्हटले की, चौकशी साठी लागणारे कागदपत्र उपलब्ध होण्यासाठी काही अवधी हवा आहे. त्यामुळे नवी तारिख मिळावी यासाठी देशमुख यांच्या वकिलांनी ED ला कळवले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशमुख यांचे वकिल जयवंत पाटील यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख आज ED च्या कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत. या प्रकरणाशी निगडीत कागदपत्र ED ला मागितले आहेत. ते देण्यात आलेले नाही. ते मिळाल्यास त्यानुसार आम्ही उत्तर देऊ. 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आय़ुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटीच्या खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. त्याप्रकरणी ED ने देशमुख यांचे स्वीय सचिव संजिव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.


ED ने देशमुख यांना पुन्हा नोटीस पाठवून आता मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.