मुंबई : रियल एस्टेटमध्ये मोठी सुस्ती आलेली दिसत आहे. रेंटल मार्केटवर याचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात भाड्याच्या घरांत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाड्यापोटी कमी रक्कम मोजावी लागत आहे.  गेल्या ७ वर्षांत प्रथम होम लोनचा रेट कमी झालाय. त्यामुळे घर भाड्याने घेऊन आपले पैसे तुम्ही वाचवू शकता. तर घरासाठी कर्ज काढून तुम्ही घर खरेदी करु शकता.


व्याज दर कमी झाल्याने फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकांनी आपल्या व्याज दरात गेल्या दोन वर्षांत कपात केलेय. १.५ टक्के कर्ज दर कमी झालेत. एसबीआयने १.७५ टक्के कमी केलेत. त्यामुळे कोणी २० वर्षांसाठी २० लाख रुपये गृहकर्ज घेतले तर मासिक हत्ता २००० रुपयांची बचत होती. त्यामुळे वर्षात तुमचे २४ हजार रुपये बचत होतात.


प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन


वर्षाच्या कल पाहता प्रॉपर्टीचे मूल्य लक्षात घेता फायदा जास्त होत नाही. पहिल्या ४ ते ५ वर्षांत व्हॅल्यूएशन लक्षात घेता दुप्पट फायदा होत होता. आता तर १० वर्षांत दुप्पट फायदा होईलच, असे सांगता येत नाही.


जर तुम्ही ४५ हजार रुपये मासिक १० वर्षांपर्यंत एसआयपीत टाकले तर १० वर्षांत १२ टक्के ग्रोथ होईल. ही रक्कम १ कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. आपल्या संपत्तीचे मूल्य २.५ टक्कांनी वाढेल.


आज अनेक तरुण जॉब करतात ते पाहता त्यांच्यात निश्चित स्वरुप नाही. त्यामुळे ते कधी दिल्लीत, कधी बंगळुरु, मुंबई तर विदेशात नोकरीसाठी जातात. त्यामुळे एका ठिकाणी ते फ्लॅट घेऊन राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना भाड्याचे घर परवडू शकते आणि पैशाची बचत होऊ शकते.