मुंबई : मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजूनही मुंबई पूर्वपदावर आलेली नाही. दरम्यान, मुंबईत मंगळवारी दिवसभरात केवळ आठ तासात ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सूनचा हा रेकॉर्डब्रेक पाऊस होता. सध्या पावसाचा जोर कमी झाला तरी पुढील २४ तासांत पुन्हा जोरदार पावासाची शक्यता आहे.


पण अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सकाळी आठच्यानंतर जोरदार पावसाचा सुरुवात झाली. सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सांताक्रूझ वेधशाळेने २९७ मिमी तर कुलाबा वेधशाळेने ६५ मिमी पावसाची नोंद केली. सांताक्रूझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १२६ मिमी पावसाची नोंद झाली होती तर पुढील तासात १७१ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सूनमधील मंगळवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 


दरम्यान, अरबी समुद्रात पश्चिक दिशेकडून वायव्य दिशेकडील वाऱ्याला वेग जोरात राहील. समुद्र किनारपट्टीवर ताशी ४० ते ४५ किमी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी साठ किमीपर्यंत जाण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.