मुंबई : मायानगरी मुंबईतला अतिउच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळकेश्वरमध्ये जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबईतला सर्वात महागडा फ्लॅटचा व्यवहार नुकताच वाळकेश्वरमध्ये करण्यात आला आहे. वाळकेश्वरमधील लिजंड कॉऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील एक फ्लॅटसाठी मालकानं तब्बल ४७ कोटी रुपये मोजले आहेत. हा डुप्लेक्स फ्लॅट तीन हजार १२ चौरस फुटांचा आहे. हिशोब मांडल्यास एका चौरस फुटाचा भाव तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांच्या घरात जातो. २०१८मध्ये आतापर्यंत झालेल्या व्यवहारामध्ये ही सर्वाधिक किंमत आहे.