मुंबई : जागतिक खेळातील सर्वांत लोकप्रिय शाखेपैकी एक म्हणजे ऍथेलेटिक्स. रिलायन्स फाऊंडेशन लिमिटेड (RIL) आणि  ऍथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांनी भारतातील ऍथेलेटिक्सच्या सर्वांगीण विकासक्षमतेकरिता दीर्घकालीन भागीदारीची घोषणा केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स फाऊंडेशन हे गेल्या अनेक वर्षांपासून एएफआयसाठी समर्पित भागीदारी म्हणून कार्यरत आहे आणि आता ही भागीदारी दोन्ही संस्थांमधील प्रतिबध्दता अधिक दृढ करण्यासाठी सज्ज आहे. तरुणांना संधी मिळावी तसंच मुलींवर विशेष लक्ष केंद्रित व्हावं म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन भारतीय ऍथेलेटिक्सच्या वाढीला गती मिळावी हा या एएफआय संघटनेचा उद्देश आहे.


कोणती आहेत भागीदारीची वैशिष्ट्ये ?


1. देशातील भारतीय ऍथलीट्सची निवड करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या खेळाचा विकास हे या भागीदारीचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर, या खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा, प्रशिक्षण आणि क्रीडा- विज्ञान आणि वैद्यकीय साहाय्य करणं हे ओडिशा रिलायन्स फाऊंडेशन अॅथलेटिक्स हाय-परफॉर्मन्स सेंटर आणि सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल यांच्यासोबतच रिलायन्स फाऊंडेशनच्या एकात्मकतेचा लाभ आहे.


2. या भागीदारीमध्ये महिला खेळांडूंवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. लिंगभेद दूर करुण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक सक्षम बनवणं हा यामागचा हेतू आहे.


3. एएफआयचे मुख्य भागीदार म्हणून रिलायन्स नाममुद्रा प्रमुख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांमधील राष्ट्रीय संघांच्या जर्सीवर व प्रशिक्षण किटमध्ये दिसून येईल.


आयओसीच्या सदस्या आवण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक नीता अंबानी म्हणाल्या, भारतीय ऍथेलेटिक्स फेडरेशनसह रिलायन्स फाऊंडेशनची भागिदारी करताना आम्हाला आनंद होतोय. ऍथेलेटिक्स जगातील लोकप्रिय शाखांपैकी एक असून मुलींवर विशेष लक्ष देऊन तरूण प्रतिभेला संधी देण्याचा प्रयत्न असेल. ही भागिदारी भारतीय ऑलिम्पिक चळवळीला भक्कम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.