रिलायन्स जिओची खुशखबर, JioFi ४जी हॉटस्पॉट राऊटर घरी पोहचणार ९० मिनिटात!
टेलिकॉम सेवा देणाऱ्या जिओने आता आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. कंपनीचे दोन प्लान जिओ सिम आणि जिओफाय राउटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
नवी दिल्ली : टेलिकॉम सेवा देणाऱ्या जिओने आता आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. कंपनीचे दोन प्लान जिओ सिम आणि जिओफाय राउटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आपल्या राउटरसह १०० टक्के कॅशबॅक ऑफरची घोषणा केली होती. आता कंपनीने ग्राहकांना अधिक सोईचे व्हावे म्हणून ९० मिनिटात होम डिलिव्हरी करण्याची नवी सुविधा दिली आहे
रिलायन्स जिओच्या वेबसाइटवर एक बॅनर लाइव्ह करण्यात आले आहे. यात लिहिण्यात आले की गेट जिओफाय @ होम इन ९० मिनिट... साधारण रिलायन्सचे हे प्रोडक्ट ऑर्डर केल्यावर दोन ते तीन दिवसात मिळते आता ही होम डिलीव्हरी ९० मिनिटात असणार आहे.
कंपनीकडून जिओफाय खरेदी करण्यासाठी दोन पर्याय दिले आहे. यातील पहिल्या पर्यायात युजर्सला 18002002002 वर कॉल करायचा आहे. या फोनवर तुम्हांला जिओफाय ऑर्डर करायचा आहे. तसेच दुसऱ्या पर्यायामध्ये युजर्सला वेबसाइटवर जाऊन बाय नाऊ करून ऑर्डर करता येणार आहे.
९० मिनिटात होम डिलीव्हरीची ही सेवा काही ठरविक ठिकाणी देण्यात आली आहे. यात होम डिलीवरीचे वेळ निश्चित करायची आहे. दुसऱीकडे जिओ आपल्या जिओफाय ४ जी राउटरला डेटा कार्ड, डोंगल आणि वायफाय हॉटस्पॉट ऑफर पण देणार आहे.
एक्सचेंजसोबत खरेदी केल्यास १०० टक्के कॅशबॅक सोब २०१० रुपयांचा डेटा (२०१ रुपयांचे १० पॅक) तसेच बिना एक्सचेंज ऑफर ५० टक्के कॅशबॅकसह १००५ रुपये किंमतीचा डेटा (२०१ रुपयांचे ५ बुस्टर पॅक ) देण्यात येणार आहे. जिओने कमी किंमतीत राउटर आणि फ्री डेटा देऊन लोकांना आकर्षित केले आहे.