मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjy Munde ) यांना बलात्कार बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा ( Renu Sharma ) हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेणू शर्मा हिने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून 5  कोटी रोख आणि 5 कोटींच्या दुकानाची मागणी केली होती. हे न दिल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती. 


तसेच सोशल मीडियावरुन बदनामी करुन तुमचं मंत्रीपद घालवेन अशी धमकीही रेणू शर्मा हिने दिली होती. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँच मध्ये धाव घेत खंडणी मागितल्याची तसेच ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली होती. 


त्यानंतर पोलिसांनी तपास करत रेणू शर्मा हिला अटक केली होती. तर, रेणू शर्मा हिने जमीन साठी अर्ज केला होता. परंतु, हा अर्ज अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने फेटाळला.


रेणू शर्मा हिच्यावर गंभीर आरोप आहेत. त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे या टप्प्यावर जामीन मंजूर केल्यास तपासावर निश्चितपणे परिणाम होईल, असे कारण देत न्यायाधीशांनी हा अर्ज फेटाळला आहे.