COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ चांगलीच दैना उडवून गेली. सकाळी सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल कोसळला. तेव्हापासून पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेची फास्ट लाईन सुरु होणार आहे. तर स्लो लाईन सुरु व्हायला मध्यरात्री १२ वाजणारेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.  तर रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी  सायन, माटुंगा, भांडुपच्या सखल भागात पाणी शिरलं होतं. सायनमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं मध्यरेल्वेच्या लोकल वाहतूकीवरही परिणाम झाला. दोन्ही रेल्वे मार्गांवर खोळंबा झाल्यानं अर्थातच लोक रस्त्यानं प्रवासाला निघाले... आणि रस्ते वाहतूकीचेही तीन तेरा वाजलेत.


अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी अंधेरी पूल दुर्घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली... मुंबईकडून फक्त घेतलं जातं! जेवढी लोकसंख्या आहे त्या मानाने मुंबईसाठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंत आहे....असं रेणूका शहाणे आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.