मुंबई : Mumbai School Reopen News: कोरोना काळात बंद झालेल्या शाळा आजपासून मोठ्या शहरात सुरु होत आहेत. मुंबईत पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. ठाणे महापालिकेचाही आजपासून पहिली ते तवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नवी मुंबईतील शाळाही आजपासून सुरू होत आहेत. ( School Reopen in Mumbai and Thane)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कॉन्व्हेंट, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ख्रिसमसनंतरचा मुहूर्त साधला आहे. तर पुण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत.



मुंबई महापालिका शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या पहिली ते सातवीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या या आदेशानंतर प्राथमिक शाळा सुरू करण्याची लगबग दिसून येतेय. 


मात्र मुंबईतील बहुसंख्य शाळांनी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याविषयी कोणतेही नियोजन केलेले नाही. यामध्ये कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. सध्या या शाळांमधून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. 



पुढील आठवड्यापासून ख्रिसमसची (नाताळ) सुट्टी सुरू होणार असून फक्त चार दिवसांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्याऐवजी ख्रिसमसच्या सुट्टीनंतर नवीन वर्षातच शाळा सुरू करण्याचा विचार कॉन्व्हेंट शाळा करीत आहेत.