मुंबई : रिपब्लीक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज हाय कोर्टात सुनावणी होणार आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना रायगड पोलिसांनी अटक केली होती. अलिबाग कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यासंदर्भात आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा. तसेच तत्काळ  जामीन मिळावा यासाठी अर्णब  यांनी हायकोर्टात धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आज केवळ अंतिरम जामिनावरच सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी रायगड पोलिसांकडून पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही सुनावण्यांकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.


डासांशी सामना 



रिपब्लिक या इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ज्या शाळेत ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांना २ रात्र डासांचा सामना करत काढाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे अर्णब यांनी बिस्किटं खावून २ दिवस काढले असल्याचंही लोकमतने म्हटलं आहे. अर्णब यांची रोजची दिनचर्या तशी अलिशान आहे. पण तुरूंगात आवडीचं जेवण नाही, मिनरल वॉटर नसल्याने त्यांची पंचायत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.


अर्णब गोस्वामी हे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी सध्या तुरूंगात आहेत, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.


विशेष म्हणजे कोरोना काळात कुणालाही भेटण्याची परवानगी नसल्याने आणखी सांगावे कुणाला असं झालं आहे. तुरुंग अर्णब गोस्वामी यांनी मिनरल वॉटरची मागणी केली होती, पण ती पूर्ण करता आली नसल्याचंही सांगण्यात येत आहे. लोकमतने सुत्रांच्या माहितीनुसार ही बातमी दिली आहे.


अर्णब यांचा मुक्काम एका शाळेत असल्याने एक पंखा आणि खाट अर्णब यांना मिळाली आहे, त्यातही डासांनी अर्णब गोस्वामी यांचा पिच्छा सोडला नसल्याने,  त्यांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. अर्णब यांनी अंघोळही केली नाही, कारण ते उप कारागृहातल्या पाण्यावर अंघोळीस त्यांची तशी नापसंती दिसून आली आहे.


अर्णब गोस्वामी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, यावर चर्चा आहे. तावातावाने हातवारे करुन बोलणारे अर्णब गोस्वामी, यांच्यासाठी हे तुरुंगात कसे दिवस काढत असतील यावर सर्वत्र चर्चा आहे.