मुंबई : २१ वर्षीय मॉडेल रेशम खान. हिच्यावर अज्ञातांनी तिच्या वाढदिवसादिवशीच अॅसिड हल्ला केला. भाजलेल्या चेहऱ्यामुळे घराबाहेर पडण्याची तिला भीती वाटू लागली. आपल्या विद्रुप रुपामुळे रेशम काही काळ खचली. पण पुन्हा नव्या दमाने उभी राहत आपल्यावर ओढवलेल्या या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी ती काय करते हे ती सोशल मीडियावर लिहू लागली. आपले उपचारानंतरचे फोटो आणि काही पोस्ट ट्विटरवर शेअर करत रेशमने अशाप्रकारे हल्ला झालेल्या मुलींना एकप्रकारे धीर देण्याचेच काम केले. त्यामुळे इतक्या लहान वयात इतका मोठा अपघात झालेला असतानाही धैर्याने उभं राहणारी रेशम खऱ्या अर्थाने रोल मॉडेल ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईदसाठी नवा ड्रेस घालत नुकतेच तिने आपले फोटो काढले आहेत. हे फोटो तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरही केले आहेत. हल्ला झाला तेव्हाचेही तिचे काही फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये तिच्या शरीरावर भाजल्याच्या खुणा दिसत असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. 


मात्र आता ईदच्या वेळी टाकलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर डाग अजिबात दिसत नाहीत. ती म्हणते, जून महिन्यात जेव्हा मी हल्ल्यामुळे उदध्वस्त झाले, तेव्हा मी पुन्हा पहिल्यासारखी दिसू शकेन, असे मला अजिबात वाटले नव्हते. जुलैमध्ये या धक्क्यातून काहिशी सावरलेली रेशम लिहिते, आपल्या घराच्या जवळ असलेल्या दुकानात जायलाही मला भीती वाटत होती. जगाला सामोरे जाण्याचीच मला एकप्रकारे भीती वाटत होती.