राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
पाहा कधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. मुख्यमंत्री परदेश दौऱ्याहून आल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि अमित शाहा यांच्यात झालेल्या चर्चेत मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यादेखील निवडणुका लवकरच केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. ४ जुलैपासून नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. त्यापूर्वी विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची चर्चा आहे. शिक्षण-पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.