Doctor Strike: राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टर म्हणजेच मार्ड डॉक्टरांना आश्वासन मिळूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीयेत. अशातच गुरुवारापासून मार्डच्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत डॉक्टरांची चर्चा झाली होती. डॉक्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून निवासी डॉक्टरांनी संप पुकारणार आहेत.


मार्ड संघटनेचे सचिव डॉ. राहुल मुंडे यांनी सांगितलं की, गेल्या 15 दिवसांपूर्वी आमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप याविषयी काही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. गेल्या दीड वर्षांपासून मार्ड डॉक्टर यासंदर्भात मागणी करतायत. 


डॉ. मुंडे पुढे म्हणाले की, यापूर्वीही आम्ही संपाचा इशारा दिला होता, मात्र मागण्या मान्य झाल्याने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे गुरुवारपासून आम्ही पुन्हा एकदा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून आम्ही संप पुकारणार आहोत. यामध्ये निवासी डॉक्टरांद्वारे ओपीडी सेवा बंद राहतील. राज्यातील जवळपास 8 हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत.


काय आहेत निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या


  • निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.

  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.

  • निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दहा हजारांची करण्यात आलेली वाढ लागू करण्यात यावी.