मुंबई : मंगळवारपासूनच दहशतीचं सावट घेऊन आलेलं निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी मुंबईत धडकण्यापूर्वीच ते ५० किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. परिणामी या चक्रीवादळाचा शहराला असणारा धोका हा आणखी कमी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी 'झी२४ तास'शी संवाद साधताना याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती दिली. निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ही सुपर सायक्लोनइतकी तीव्र नाही. मुळात हे वादळ जितक्या वेगानं तयार झालं आहे. तितक्याच वेगानं ते शमण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळं आतापर्यंत एकही वादळ मुंबईला धडकलेले नाही, हे वादळही थेट मुंबईला धडकत नाही. असं ते म्हणाले. 



'या' व्हिडिओंमध्ये पाहा 'निसर्ग' चक्रीवादळाचं रौद्र रुप


पाहा निसर्ग वादळाचा प्रत्यक्ष प्रवास



दरम्यान, वादळाची दिशा ही दक्षिणेकडे सरकल्यामुंळं शहरावरील धोका कमी झाला आहे. असं असलं तरीही प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार अलिबागपासून अवघ्या ९५ किलोमीटर अंतरावर हे वादळ पोहोचलं आहे. 


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईपासून हे वादळ काहीसं दूर गेलं असलं तरीही पालघर, नाशिक, पुणे, उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्येही त्याचे परिणाम दिसणार आहे. वादळामुळे या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.