मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri ByPoll Election) शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray) असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutija Latke) यांच्या शिंदे गट दबाव टाकत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केलाय. लटकेंना मंत्रिपदाचीही ऑफर दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच ऋतुजा लटके यांनी महापालिकेतील (BMC) नोकरीचा सशर्त राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा मंजूर न कऱण्यासाठी आयुक्तांवर शिंदे गटाचा दबाव असल्याचा आरोपही ठाकरे गटानं केलाय. यासाठी ठाकरे गटानं आता कोर्टात धाव घेतलीय. राजीनामा मंजूर झाला तर ऋतुजा लटकेच ही जागा लढवणार असंही अनिल परब यांनी ठणकावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यावर कोणताही दबाव नाही
दरम्यान, आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. आमची निष्ठा ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे. माझे पती रमेश लटके (Ramesh Latke) यांची निष्ठा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती. त्यामुळे निवडणूक लढणार ती मशाल चिन्हावरच लढणार असं ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं आहे. पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी ऋतुजा लटके आज महापालिका कार्यालयात आल्या आहेत.  यावेळी आयुक्तांना भेटून राजीनामा आजच्या आज स्विकारण्यात अशी विनंती आपण करणार असल्याचं ऋतुजा लटके यांनी सांगितलं. 


शिंदे गटही निवडणूक लढवणार
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार असल्याची माहिती मिळतेय. अंधेरीची मूळ जागा ही शिवसेनेची असल्याने भाजप शिंदे गटाला जागा देण्याबाबत विचार करत आहे. शिंदे गटाला जागा मिळाल्यास अंधेरीत शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट सामना होणार रंगणार आहे. तसंच  भाजप शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतं अशीही माहिती मिळतेय...