मुंबई : पालकांची धावती लोकल पकडण्याची घाई चिमुकलीच्या जीवावर कशी बेतली असती याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकात ११ मे रोजी ही घटना घडली आहे. या चार वर्षीय मुलीचे पालक मुलीला घेऊन महालक्ष्मी इथून चर्चगेट लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पोहचले. त्यावेळी अचानक ही लोकल सुरु झाली. त्यामुळे मुलीच्या पालकाने धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात मुलीचा हात सुटल्याने ती लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगी प्लॅटफॉर्मखाली जाणार तितक्यात तिथे असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या सचिन पाल या जवानाने प्रसंगावधान दाखवलं. जीवाची बाजी दाखवत या जवानाने या मुलीला खेचून घेतले आणि तिचे प्राण वाचवले. जवानानं दाखवलेल्या या धाडसामुळे या चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचलाय. मात्र यामुळे धावती लोकल पकडण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


पाहा व्हिडिओ