...तर राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन आंदोलन करु- संघ
आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो.
ठाणे: वेळ पडल्यास आम्ही राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी दिला. ते शुक्रवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्रीराम सर्वांच्या हदयात असला तरी त्याचा वास मंदिरात असतो. त्यामुळे राम मंदिर व्हावे, ही आमची इच्छा आहे. यामध्ये काही अडथळे जरुर आहेत. मात्र, न्यायालय हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय देईल, याची आशा आहे. मात्र, तरीही गरज पडल्यास १९९२ सारखं आंदोलन करण्यात येईल, असे भय्याजी जोशींनी सांगितले.
आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. २०१०च्या अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. दिवाळीच्या आधी आनंदाची बातमी मिळेल अशी आमची इच्छा होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तो त्यांचा अधिकारच आहे. मात्र, राम मंदिरासाठी वेळ लागतोय हे वेदनादायी असल्याची भावना भय्याजी जोशी यांनी व्यक्त केली.