देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुंबईकर प्रवाश्यांना रिक्षा चालकांच्या मुजोरीचा प्रत्यय रोजच येत असतो, मात्र आता मुजोरी करणाऱ्या,भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांची काही खैर नाही, याच कारण म्हणजे मुंबई उपनगरात गेल्या काही दिवसांपासून आर टी ओ मार्फत रिक्षा चालकांची कडक तपासणी सुरू आहे. तपासणीमध्ये रिक्षाची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र,गाडीची स्थिती,लाईन्स बॅच या गोष्टी तपासल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे भाडं नाकारणे, उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ७४७ भाडं नाकारल्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे. ४१ रिक्षाचालकांवर जादा भाडे आकारल्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे. ३७५१ रिक्षाचालकांकडे बॅच/लायसन्स नाहीत, ४११ रिक्षा चालकांवर जास्त प्रवासी  वाहतूक केली म्हणून कारवाई. त्याचप्रमाणे १७५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. अशी महिती मोटर वाहन निरीक्षक राहुल पवार यांनी दिली आहे.   


बेशिस्त रिक्षा चालकांमुळे शहरांमधील वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. रिक्षा चालकांच्या वाईट वर्तनाचा अनुभव आलेल्या मुंबईकरांनी परिवहन विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले. 


आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईत सर्वसामान्य प्रवासी त्याचबरोबर परदेशी नागरिकही प्रवास करतात. रिक्षा चालकांच्या असभ्य वागणुकीमुळे मुंबई शहराची प्रतिमा देखील ढासळत आहे. याला कारणीभूत मुजोर रिक्षाचालक आहेत.