आरटीओ अधिकारी १५ दिवस मोहिम राबवणार
राज्यभर ओव्हरलोड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान पंधरा दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबई : राज्यभर ओव्हरलोड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान पंधरा दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे.
वायूवेग पथक अर्थात फ्लाईंग स्कॉवाडला ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करुन अहवाल सादर करावा लागणार आहे.
या तपासणीत कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ओव्हरलोड वाहने कशी जीवघेणी आहेत आणि यामध्ये परिवहन अधिका-यांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार कसा चालतो याचा झी 24 तासने स्टिंग ऑपरेशन द्वारे खुलासा केला होता.
आता झी २४ तासच्या बातमीच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय.