मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या न कोणत्या मुद्यावर दररोज सरकारला लक्ष्य करत असतात. आता खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सरकारला खडसे यांनी जोरदार झापले.


रुग्णालयांना समारंभपूर्वक टाळं मारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर नसलेल्या शासकीय रुग्णालयांना टाळं ठोकण्याचा खोचक सल्ला खडसेंना सरकारला दिला. एवढंच नव्हे तर आपल्याचा अशा रुग्णालयांना समारंभपूर्वक टाळं लावायचं असून त्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी वेळ देण्याचा टोलाही त्यांनी लगावला. 


ग्रामीण रुग्णांच्या जीवाशी खेळ


ग्रामीण रुग्णांची मोठ्या प्रमाणाता हेळसांड झालेय. अनेक सोयी-सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरच नाहीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय पदे भरण्यात आलेली नाही. मी रितसर पत्र देऊन मागणी केली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.


माझी बदली करा - खडसे


मात्र अद्यापही डॉक्टर देण्यात आलेले नाही. त्यामुळे डॉक्टर नसलेल्या दवाखान्यांना कुलुप ठोकण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान, अनेकवेळा चौकशी केली तर त्याची बदली झालेय, अशी माहिती देण्यात येत. त्यामुळे माझीही बदली करुन टाका, असा बोचरा इशारा खडसे यांनी दिली.