मुंबई : राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहे. कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले काम पाहायला हवे, असा टोला शिवसेनेने "सामना' संपादकीयमधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी देखील कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे, असं म्हटलंय. अशा नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत!, अशी टीका भाजप नेत्यांवर केली आहे. 


करोनाचे संकट वाढत आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी पुन्हा एकदा कठोर लॉकडाउन केले. त्यांना हे लॉकडाउन का करावे लागले, हा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात करोना नियंत्रणात आणण्यासाठी योगी सरकारने जे कष्ट घेतले, जे एक यशस्वी ‘मॉडेल’ राबवले त्याचे कौतुक केले. आम्हीही त्याच मताचे आहोत. यंत्रणात आल्याशिवाय देशात करोनाविरुद्धचे युद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे केंद्राने उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांकडे करोनासंदर्भात जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेश ‘मॉडेल’वर पुन्हा कडक लॉक डाऊन लादण्याची वेळ यावी याचा अर्थ काहीतरी चुकले आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.



आज धारावीतून कोरोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले. 'धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच', असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय हा जरा अतिरेकच असल्याचं आजच्या सामनामध्ये म्हटलंय.