मुंबई : एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करून जाळला जातो, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधून टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधून १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. या अत्याचारात तरुणीच्या मान आणि कंबर दोन्हीचे हाडे निकामी झाली. एवढंच नव्हे तर सत्य जगासमोर येऊ नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली. दहा दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या मुलीचा देह दिल्लीतील रुग्णालयात शांत पडला. तिच्यावरील अत्याचार एवढ्यावरच थांबले नाहीत. तर पोलिसांनी परस्पर कुटुंबियांना न सांगता तिच्यावर अत्यंसंस्कारही केले. काय ती विटंबना? या सर्व प्रकरणावर आज "सामना"तून टीका करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीषा वाल्मीकी नावाच्या तरूणीवर उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ही घटना घडली. मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक मनीषाच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत.  


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे