मुंबई : कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्यात आली आहे. कोरोना उपायजोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर आहे, असे जोरदार  फटकारे उच्च न्यायालयाने मारले आहेत. याउलट महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालये गेल्या दोन महिन्यांत उभी कली आहेत त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी आणि एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करुन यावे, असा सल्लाही विरोधकांना शिवसेनेने दिला आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्यातील तयारीची कल्पना येऊ शकेल, असा चिमटाही काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोरोनाच्या युद्धात अडथळा आणत आहे. सरकारविरोधात आपल्या तोंडाचा ताशा वाजवत ठेवायचा आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, राज्य सरकार कसे अपयशी ठरत आहे आणि जनता कशी वाऱ्यावर पडली आहे, अशी बदनामी करायची. हे सर्व करीत राहिल्याने 'ठाकरे सरकार' कोलमडेल आणि आपला वनवास संपले, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहात आहे. विरोधी पक्ष त्यादृष्टीने भ्रमात आहे.असे काहीह घडण्याची सुतराम शक्यता नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा नववास हा किमान १४ वर्षांचाच असेल हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. विरोधी पक्षाचे मागणे आहे की, राज्य सरकारने एक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. राज्य सरकारने वेगळे पॅकेज जाहीर करावे, याचा अर्थ केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटींचे पॅकेज पोकळ आणि कुटकामी आहे. केंद्र सरकारने हे पॅकेज संपूर्ण देशासाठी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या पॅकेजची तुलनाा 'रिकाम्या खोक्या'शी केली आहे. 'खोका रिकामा' आणि नेहमीप्रमाणे जाहिरातबाजीच जास्त, असे सामना अग्रलेखात म्हटल आहे.


महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात काम सुरु आहे. शेजारच्या भाजपशासित राज्यातील दुरवस्था पाहिली तर महाराष्ट्राने पुकारलेले कोरोना युद्ध अपयशी ठरणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. गुजरात राज्य हे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे गृहराज्य आहे. कोरोना उपायजोजनासंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा यंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयाने मारले आहेत. यावरुन काय परिस्थिती लक्षात येत आहे. केवळ विरोध करायचा आणि राजकारण करायचा असा विरोधकांचा प्रयत्न आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.


अहमदाबादमध्ये कोरोनावर उपचार करणारे जे मुख्य शासकीय रुग्णालय आहे, या रुग्णालयातच आतापर्यंत ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा धक्कादायक आहे. उच्च न्यायालयाचा असा निष्कर्ष आहे की, गुरजारमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशीच करावी लागेल. सरकारी रुग्णालयाची स्थिती 'खतरनाक' आहे. कोणत्याही सुविधा नाहीत. मनुष्यबळ नाही. रुग्ण तेथ मरायलाच दाखल होतात, असे न्यायालय म्हणत आहे. तेथेही विरोधी पक्षाला भरपूर काम आहे. पण तेथील विरोधी पक्ष फालतू राजकारणात न पडता सरकारला जमेल तशी मदत करत आहे, असे म्हणत विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्लाही दिला आहे. फालतू बडबड करत नाही तर ठाकरे सरकार करुन दाखवत आहे, असे या शिवसेनेने म्हटले आहे.