Antilia case : मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात; सचिन वाझे याने असा रचला कट, अखेर असे फुटले बिंग
Antilia case : अँटिलिया स्फोटक कारप्रकरणात आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता.
प्रशांत अंकुशराव / मुंबई : Antilia case : अँटिलिया स्फोटक कारप्रकरणात आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता. त्याची माहिती आता समोर येत आहे. सचिन वाझे (Sachin Waze) याने रचलेल्या कटाचे अखेर बिंग आहे. दरम्यान, सचिन वाझे याने मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे.
अँटिलिया स्फोटक कारप्रकरणी (Antilia Case News0 सचिन वाझे (Sachin Waze) याने मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या जबानीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. NIA ने न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यात सहाय्यक पोलीस आयुक्तांची जबाब आहे. अँटिलिया कार प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल नाही, हिरेनचा मृत्यू ही आत्महत्याच आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वाझे पटवून सांगत होता. तसेच तपास आपल्याकडेच सोपवावा अशीही त्याची मागणी होती, असे या जबाबात म्हटले आहे.
स्फोटके असलेली कार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ मिळाल्यानंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक हिरेन मनसुख याचा मृतदेह कळवा येथील खाडीत मिळाला होता आणि हा सर्व मुद्दा विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री यांनी 5 मार्चला बैठक बोलावली होती. त्या बैठकीत इतर अधिकारी ही हजर होते. त्यावेळी सचिन वाझे यांने मुख्यमंत्री यांना माहिती दिली की, जी गाडी सापडली आहे, त्यात कोणताही दहशतवादी अँगल नाही. तसेच हिरेन याचा मृत्यू हा आत्महत्या आहे, हे पटवून सांगू लागला. तपास मीच करतो अशी ही विनंती वाझे याने केली. ही बैठक मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी व्हीआयपीरूममध्ये पार पडल्याचे ही सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या जबाबात म्हटले आहे.
नाव मोठे व्हावे आणि प्रसिद्धी मिळावी, हा हेतू...
सचिन वाझे आपले नाव मोठे व्हावे प्रसिद्धी मिळावी आणि त्यातून बढती मिळावी, या हेतूने त्याने जिलेटीनच्या कांड्या ठेऊन गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवली होती. या प्रकरणाचा तपास स्वतः करून त्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि बढती आणि बक्षिसी मिवायची होती, पण केलेले प्लान बिघडत गेला. गाडी अँटिलियाजवळ पार्क केल्यानंतर त्यात त्याचे ओळखपत्र राहिले म्हणून परत यावे लागले होते. तर दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर हा साक्षीदार झाला. त्याने एनआयएला अधिक माहिती आणि पुरावे गोळा करण्यास मदत केली आहे. गाडीची नंबर प्लेट बदलल्याने आणि तो नंबर अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाडीचा लावल्याने अंबानी यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित गाडी दुसरी असल्याचे ओळखले होते. तर या गाडीचा मालक मनसुख हिरेन पुढे आल्याने वाझे याचा प्लान बिघडला आणि एका मागे एक चुका करत असतानाच त्याने मनसुख हिरेन याची हत्या केली.
या कामी त्याने आपल्या गुरूची म्हणजे प्रदीप अहरमा याची साथ घेतली आणि पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मदतीने त्याचा काटा काढला. या कामाकरिता प्रदीप शर्मा याला पैसे देण्यात आले असल्याचे ही आरोप पत्रात म्हटले आहे. हे प्रकरण घडत असताना वाझे पंचतारांकित हॉटेलमध्ये ओळख बदलून राहत होता. तसा पुरावा आणि सीसीटीव्ही प्राप्त झाला आहे. तर त्याला भेटायला आलेली ती मिस्ट्री वुमन त्याच्या ओळखीची होती. तिला तो वारंवार पैसे देत असे. हॉटेलमध्ये वाझे याने दिलेल्या काही पैशांमधील काही पैसे परत देण्यासाठी ती हॉटेलमध्ये आली असल्याचे तिच्या जवाबात स्पष्ट झाले आहे.
आता सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहे. न्यायलयीन कोठडीत आहे. न्यायालयाच्या परवानगीने तो भिवंडीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र तेथूनही मुंबईत उपचारासाठी पाठवावे, असा अर्ज त्याने न्यायालयात केला आहे.