मुंबई : खासदार राजू शेट्टी यांना नेतेपदाचं ग्लॅमर चढलंय, अशा तीव्र शब्दांत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय. 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे, आत्तापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेली धुसपूस आता थेट चव्हाट्यावर आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवत यशस्वीपणे पोहचवत असल्यामुळं राजू शेट्टींना नेतेपदाचं ग्लॅमर जाण्याची भीती वाटत आहे. आणि त्यामुळंच ते वारंवार टीकेचा भडीमार करत असल्याचा पलटवार सदाभाऊ खोत यांनी केलाय.


'सदाभाऊ असाच काम करत राहिला तर एक वेगळं वातावरण निर्माण होईल, अशी त्यांची मानसिकता निर्माण झाली... आणि मग आपल्या नेतेपदाचं ग्लॅमर कमी होईल की काय? शेतकरी नेतेपदाला धक्का बसेल की काय? अशी भीती जाणवू लागली... त्यामुळेच माझ्यावर शाब्दिक हल्ले सुरू झाले' असं म्हणतानाच 'मी असं काय धोरण ठरवलं ज्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला' असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.


मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप संपुष्टात आल्याची घोषणा झाली त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि चळवळीचा घात केला... या प्रकाराबाबत त्यांना कार्यकारणीमध्ये योग्य जाब विचारू... सदाभाऊंनी छातीवर जो बिल्ला लावला त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले नाहीत... त्यांची लुडबूड आम्हाला मान्य नाही, असं म्हणत शेट्टींनी सदाभाऊंवर चांगलीच टीका केली होती.  


इथे पाहा काय म्हटलंय सदाभाऊंनी...