समीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला
यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मिळाला आहे, यानंतर त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना जामीन मिळण्याची शक्यता वाढली होती, पण समीर भुजबळ यांना तुर्तास जामीन मिळालेला नाही. समीर भुजबळ यांच्या जामीनावर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम जामीन देण्यास सध्या तरी नकार दिला आहे. समीर भुजबळ यांना फेब्रुवारी २०१६ रोजी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली होती, यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
समीर भुजबळ यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप
समीर भुजबळ यांची एसीबीकडून, २० फेब्रुवारी २०१५ रोजी, ३ तास प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. एसीबीच्या १८ अधिकाऱ्यांनी समीर भुजबळ यांची राऊंड टेबल चौकशी केली. एकूण ११ मुद्दयांवर समीर भुजबळ यांची चौकशी झाली. महाराष्ट्र सदन, एमईटी, कोळसा घोटाळा, टोल नाका आणि इतर विषयांचा समावेश आहे.
समीर भुजबळांची चौकशी २०१५ मध्येच
तीन तासांत ‘एमईटी’च्या शेकडो एकर जागेसंबंघी समीर भुजबळ यांची चौकशी करण्यात आली होती, यात अंधेरी आरटीओ ऑफिसचे २२ माळे, नवी मुंबई येथे हेक्स बॉक्स आर्मस्ट्राँग आणि एसआरएमध्ये मिळालेले कंत्राट, हे चौकशीचे विषय होते, तसंच नाशिक इथल्या दिंडोरी, गोवर्धन आणि इतरत्र असलेली शेकडो एकर जमीन आणि पैशांच्या व्यवहाराबद्दल समीर भुजबळ यांची चौकशी करण्यात आली होती. यानंतर त्यांना एक वर्षानंतर अटक झाली होती.