GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी
Mumbai Job: लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
SAMEER Job: तुम्ही कॉमर्समध्ये पदवीधर आहात? आणि तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेटिंगदेखील येतं? मग ही बातमी तुमच्याच कामाची आहे. कारण तुम्हाला मुंबईमध्ये चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 'सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च' (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research,SAMEER) या संस्थेत ही भरती केली जाणार आहे.
SAMEER येथे लेखाधिकारी II या पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराला सरकारी नियमांची माहिती असावी. तसेच फायनान्स अकाऊन्ट, ऑडीटींग, सेटलमेंट ऑफ स्टाफ बेनिफिट, इनकम टॅक्स टीडीएस आणि संबंधित कामाचा अनुभव असावा. सरकारी कार्यालय/पीएसयू/ स्वायत्त संस्था/ पब्लीक बॉडी किंवा मान्यताप्राप्त कमर्शियल संस्थेत काम केलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पद आणि अनुभवानुसार 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
लेखाधिकारी II या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि संशोधन, IIT कॅम्पस, पवई, मुंबई 400076 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 29 सप्टेंबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑफलाइन माध्यमातूनच स्वीकारले जातील. इतर कोणत्या माध्यमातून स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Mumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एसबीआयच्या मुंबई शाखेत भरती
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
एसबीआयच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी होणारी मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या. किमान पात्रता गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवारांची कट-ऑफ गुणांची यादी त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने तयार केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.