मुंबई : वाढती गुन्हेगारी, त्यातून पोलिसांवर वाढणारा कामाचा ताण आणि संवाद साधताना निर्माण होणारा अडथळा, यावर एक 'स्मार्ट' उपाय शोधण्यात आला आहे. राज्यभरातली पोलीसांसाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून स्वत: पोलीस आयुक्तही पोलिसांशी थेट संवाद करू शकणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, 'संवाद' असे या अॅपचे नाव असून, अॅपच्या माध्यमातून पोलीस आयुक्त सुमारे ४० हजार पोलिसांशी संपर्क साधू शकतात. हे अॅप ईमेलवरील पोलीस पत्रक आणि वायरलेस या संदेशवहनांच्या यंत्रणांसोबत कार्यरत असणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष डिस्प्ले मॉनिटर बसविण्यात आले आहेत. या मॉनिटरवरून पोलीस नोटीस वाचता येते. पोलिसांकडील ठराविक गाड्यांवर आणि पोलिसांकडेही वायरलेस सेट असतो, पण अनेकदा प्रत्येक माहिती ही पोलिसांकडे पोहोचतेच असे नाही. या उलट मोबाईल हा प्रत्येकाकडे असतोच आणि प्रत्येक जण तो आवर्जून पाहतो. त्यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून पोलिसांशी संवाद साधने सोपे होणार आहे.


दरम्यान, अद्याप हे 'संवाद' अॅप कार्यन्वीत करण्यात आले नासून, त्याचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू आहे.


'संवाद' अॅप वैशिष्ट्ये


- आदेशानुसार कार्य. उदा. सर्व पोलिसांशी आदेश असल्यास तो सर्वाना दिसेल. पण, जर  पदावरील एकाच अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी तो आदेश असेल तर, तो फक्त त्यालाच दिसेल.
- अॅन्ड्रॉइड तसेच आयओएस तसेच इतर प्रणालीच्या मोबाईलवर हा अॅप कार्यन्वीत होईल. 
- गोपनियतेच्या कारणास्तव केवळ  पोलिसांसाठीच हा अॅप उपलब्ध 
- बंदोबस्तचे आदेश, फिटनेस मंत्र, विविध योजनांची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळेल...