मुंबई : येत्या 26 जानेवारीला मुंबईत संविधान रॅली निघणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते या संविधान रॅलीत सहभागी होणार आहेत. 


कोण होणार सहभागी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संविधान रॅलीमध्ये शरद पवार, राजू शेट्टी, फारुख अब्दुल्ला, शरद यादव, सीताराम येचुरी, तुषार गांधी या प्रमुख नेत्यांचाही सहभाग असेल. या देशात सुरू असलेली अराजकता, संविधानाच्या मूळ गाभ्याला लावण्यात येणारी नखं या विरोधात हा मोर्चा आहे.


कुठून होणार सुरूवात?


या आंदोलनाला कोणताही झेंडा नाही हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय आहे. हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे यात कुणीही सामील होऊ शकतं असं, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. ही रॅली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरु होईल आणि गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिचा समारोप होईल.