अजोय मेहता यांची नार्को टेस्ट करा - संदीप देशपांडेंची मागणी
मुंबई नववर्षाच्या सेलिब्रेशन आधी अवघे काही दिवस आधी कमला मील कमाऊंडमध्ये भीषण आग लागली होती. या अग्नीतांडवामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर या अग्नीतांडवाला नेमके जबाबदार कोण? यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मुंबई : मुंबई नववर्षाच्या सेलिब्रेशन आधी अवघे काही दिवस आधी कमला मील कमाऊंडमध्ये भीषण आग लागली होती. या अग्नीतांडवामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर या अग्नीतांडवाला नेमके जबाबदार कोण? यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मनसेचे नेते संदीप देशपांडेंची मागणी
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी मनसेनं केली आहे . कमला मिल कम्पाऊंडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी आयुक्त अजोय मेहतांवर फोन करून दबाव आणणारा महापालिकेतील नेता कोण.. तो सत्ताधारी पक्षाचा आहे की मग विरोधी पक्षातला भैया आहे ? त्यामुळे आयुक्तांनी त्याचं नाव जाहीर कारावं.. नाहीतर खरं खोटं काय आहे.. हे बाहेर येण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे..
आयुक्त अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट
आगीच्या दुर्घटनेनंतर कारवाई थांबवण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता.. असा गौप्यस्फोट आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात केला होता..