COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : ती  शिकून मोठी व्हावी म्हणून, तिच्या आईनं अपार कष्ट घेतलेत.... घर सांभाळून सायलीनं दहावीचा अभ्यास केला..... परिस्थिती अत्यंत कठीण असताना सायलीनं दहावीच्या परीक्षेत ९०.३० टक्के मिळवले.... पाहुया सायलीचा संघर्ष....


सायली सरवदे..... नवी मुंबईतल्या तुर्भेमधल्या झोप़डपट्टीत भाड्याच्या घरात राहते....  घर जेमतेम दहा बाय दहाचं....  सायली आणि तिच्या भावाला आईनंच वाढवलं.... त्यामुळे घरकामाचा बराचसा भार सायलीवरच पडत होता..... सायलीच्या आईनं अपार कष्टानं मुलांना शिकवलं... बऱ्याचवेळा एकाच वेळी जेवून मुलं वाढली आणि शिकलीही.... कुठलीही शिकवणी नसतानाही सायलीनं दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के मिळवलेत. 


सायलीची आई घरकाम करते. सायलीची पुस्तकं घेता यावीत, म्हणून सायलीची आई बारा बारा तास सुरक्षा रक्षकाची नोकरी करायची. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी सायलीवर पडायची. सायलीनं परिस्थितीवर जिद्दीनं मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलंय... सायलीला मोठं होऊन कलेक्टर व्हायचंय... तिच्या स्वप्नांना बळ देणं ही आपलीही जबाबदारी आहे... त्यासाठी पुढे या... सायलीच्या संघर्षाला साथ द्या... तिच्या स्वप्नांना बळ द्या..


परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...  


तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा 


संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६


पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 


ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 


लोअर परळ, मुंबई - ४०००१३


ई-मेल : havisaath@gmail.com