संजय निरुपम यांचा मनसेवर गंभीर आरोप
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचं दिसत आहे. रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला.
मुंबई : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचं दिसत आहे. रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
संजय निरुपम यांनी म्हटलं की, राज ठाकरेंनी परवानगी नसताना मोर्चा काढला, फेरीवाल्यांना अल्टिमेटम दिलं आणि आजपर्यंत राज ठाकरेंवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, माझ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वत्र फेरीवाला, ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करा, फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतला जातो. मनसेचे कार्यकर्तेच फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतात असाही आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम पत्रकार परिषद मुद्दे:
विनापरवानगी मोर्चा काढून प्रक्षोभक भाषण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, पण गृहखाते पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने माझ्यावर मात्र गुन्हा दाखल होतो
मनसेचे नेते फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतात, योग्यवेळी नावे जाहीर करेल
माझे लोकांना आवाहन आहे की मनसेची गुंडगिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे
नितेश राणे कुठल्या पक्षात आहेत हे आधी त्यांनी ठरवावं. मी लहान मुलांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही
मी फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतो हे कुणी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडून देईन
मोकळे पदपथ हा नागरिकांचा हक्क, पण रोजीरोटीही तेवढीच महत्वाची
लोकांच्या हक्काचे मोकळे भूखंड शिवसेना-भाजपने लाटले
द्वेष, आणि हिंसाचाराच्या राजकरणामुळे लोकांनी मनसेला नाकारलं. पक्ष रिकामी झाला हे राज ठाकरे यांनी आता तरी लक्षात घ्यावं
जखमी मनसे कार्यकर्त्याची प्रकृती लवकरात सुधारावी ही ईश्वर चरणी प्रार्थना, पण त्या कार्यकर्त्याना देव सुबुद्धिही देवो
मुंबईत एकही फेरीवाला अनधिकृत नाही. कायदा बनलाय. पण सरकारला त्याला मंजुरी द्यायची नाहिये. फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्या प्रकरणी ११२ प्रकरणे न्यायालयात सुरु आहेत. न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही न्यायालयाचे आदेशा अवमान करीत महापालिकेची कारवाई सुरू आहे.
मालाडमध्ये मनसे फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना पून्हा हटवण्यास सुरुवात केली.
मनसेची सुरु असलेली गुंडगिरी संपली पाहीजे असंही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी कायदा हातात घेऊन चोख प्रत्युत्तर द्या असे वक्तव्य संजय निरुपम यांनी केलं. त्यामुळे संजय निरूपम यांच्याविरुद्ध रविवारी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.