मुंबई : फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन छेडल्यानंतर कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी यामध्ये उडी घेतली होती. फेरीवाला आणि विना फेरीवाला असे झोन बनवण्याचीदेखील मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत फेरीवाला सन्मान मोर्चाचेे आयोजन केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत काँग्रेसनं आयोजित केलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमच सहभागी झाले नाही. निरुपम यांच्या गैरहजेरीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.


आधी स्टार मॉल पासून कबुतरखान्यापर्यंत मोर्चा काढायला पोलीसांनी परवानगी दिली होती.  मात्र, अचानक मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला. त्यानुसार कॉंग्रेस कार्यकर्ते रानडे रोडवरील नक्षत्र मॉलजवळ कॉंग्रेस कार्यकर्ते जमा झाले. मात्र तेथेच कॉंग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले.  निरुपम मोर्चात सहभागी न झाल्यानं या मोर्चाला किती प्रतिसाद मिळतोय यावर प्रश्नचिन्हच आहे.