मुंबई : काँग्रेसचे मुंबई शहरचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी पक्षाला गरज नाही, असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली. तसे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे हा काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठा धक्का मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमधील वाद निवडणुकीच्या तोंडावरच चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे  नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मी एक नाव विधानसभा निवडणुकीसाठी दिले होते. त्याचीह विचार पक्षाकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे काँग्रसचा त्याग करण्याची वेळ आली आहे, असे निरुपम  म्हटले आहे. हा काँग्रेसला एक इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.




तिकीट वाटपाबाबतची जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. निरुपम यांनी एक ट्विट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाला माझ्या सेवेची गरज उरलेली दिसत नाही. मी दिलेली नावे वगळण्यात आल्याचे मला समजले आहे. त्यामुळे असे होत असेल तर निवडणूक प्रचारात भाग घेणार नसल्याचे मी पक्ष नेतृत्वाला कळवले आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.  दरम्यान, त्याचवेळी पक्षाला गुडबाय म्हणण्याची माझ्यावर वेळ येणार नाही, असेही ते म्हणालेत.