`पंतप्रधानांचं भाषण होऊ देण्यासाठी अटलजींच्या मृत्यूची घोषणा दुसऱ्या दिवशी ?`
मोदी यांचं भाषण होऊ देण्यासाठी मृत्यूची घोषणा १६ ऑगस्टला करण्यात आली असावी असा संशय
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यू १६ ऑगस्टला झाला ? की त्यांच्या मृत्यूची घोषणा १६ ऑगस्टला केली ? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
राऊतांना संशय
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या सदरात संजय राऊत यांनी स्वराज्य याविषयी लिहीताना मोदी सरकारला टोला मारलाय.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक टाळण्यासाठी आणि मोदी यांचं भाषण होऊ देण्यासाठी मृत्यूची घोषणा १६ ऑगस्टला करण्यात आली असावी असा संशय संजय राऊत यांनी या सदरात केलाय.