मुंबई: मी जागतिक आरोग्य संघटनेविषयी WHO केलेल्या वक्तव्याचा आपल्याकडे निषेध होण्याचे कारण नाही. उलट या वक्तव्यासाठी भाजपवाल्यांनी मला पाठिंबा द्यायला हवा. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही WHO वर टीका केली होती. परंतु, ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावर मला पाठिंबा द्यायला हवा, असे संजय राऊत यांनी सांगितले. यापूर्वी मोदींनी लंडनला जाऊन अपमान केला होता. आपल्याकडच्या डॉक्टरांना  पैसे कमावण्यात रस असल्याचे बोलले होते. मग मोदींनी बोलल्यावर का टीका होत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आपण एवढे निष्णात कंपाऊंडर घडवले याचा डॉक्टरांना अभिमान वाटायला हवा'


तसेच जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी WHO ला फटकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही WHO चीनची हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे माझ्यावर टीका करण्याआधी तुम्ही ट्रम्प आणि पुतीन यांचाही निषेध केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 


'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'


संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे राऊत यांनी सांगितले.