मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED)ने समन्स पाठवले आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'अशा प्रकारची कारवाई होईल. अशी आम्हाला खात्री होती. ज्या प्रकारे घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा, शिवसेनेचा बाणा वाचवण्यासाठी आणि जे कोणी सोडून गेले त्यासाठी आमच्यासारख्या माणसाला उतरावं लागलं त्यामुळे महाराष्ट्रद्रोही काही लोकं एकत्र येऊन. त्यांच्या वडोदरा येथील बैठकीत ठरलं की, 'संजय राऊत को टाईट करो.''


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईने माझी मान कापली तरी, मी गुवाहाटीला जाणार नाही. माझ्यावर खोटे खटले दाखल करणार असाल तर माझी तयारी आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत मी 30 वर्ष काम केलंय, माझं मनोधर्य ते खच्ची करू शकत नाही.' असे राऊत यांनी म्हटले आहे.


'उद्या माझी अलिबागला सभा आहे. त्यासाठी मी जाणार. ईडीची लढाई कायदेशीर लढणार. राज्यातील राजकीय घडामोडी देखील आहेत. त्याकडेही लक्ष आहे. परंतू केंद्राने जर ठरवलंच असेल की, मला अटक करायचीये. तर ते करू शकतात.' असेही राऊत यावेळी म्हणाले.