मुंबई : 'रोखठोक' वक्तव्यामुळे संजय राऊत कायमच चर्चेत असतात. पण या रोखठोक व्यक्तीमागे एक हळूवार, मजेशीर असा बाप दडलाय. हे आपण संजय राऊत यांच्या मुलीच्या पोस्टमधून अनेकदा पाहिलंय. पण आता संजय राऊत चक्क गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत संजय राऊतांनी ठेका धरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहेत. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे. संजय राऊत यानिमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असून लग्नासाठी निमंत्रण देत आहे.



दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.



संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.