मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडी आज संपली होती. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Scam) त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना 1 ऑगस्ट रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (money laundering) कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. सुनावणीसाठी संजय राऊत हे कोर्टात दाखल झाले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक धनुष्यबाण हे चिन्ह गोठल्याबाबत प्रतिक्रिया दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नावात काय? नाव गोठवलं तरी शिवसेना तीच अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी झी 24 ताससोबत बोलताना दिलीय. "कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल.  ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या. काँग्रेसचे तीन वेळा चिन्ह गोठवले होते. जनता दलाचेही चिन्ह गोठवले होते. नावात काय,शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे," असे संजय राऊत म्हणाले.


"अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात  सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे," असेही संजय राऊत म्हणाले.


दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा शिवसेनेचे (Shivsena) धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा (froze) हंगामी आदेश दिला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने चार तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना  नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड केली आहे.