Rohit Pawar tweet on Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर झालाय. पीएमएलए कोर्टानं त्यांना दोन लाख रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर केलाय. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam Case) त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा अनेकदा जामीन नामंजूर केला होता. तब्बल 102 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना 31 जुलैला अटक करण्यात आली होती. दरम्यान संजय राऊत यांना जामीन मिळाला ही बातमी कळताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्याशिवाय अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांनीही ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. 


रोहित पवार यांचं ट्वीट (Rohit Pawar tweet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार यांनी वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला (Tiger video) असं व्हिडीओ ट्वीटवर शेअर केला आहे. रोहित पवार यांनी संजय राऊतांच्या जामिनावर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केलीय. (Sanjay Raut Gets Bail and Rohit Pawar tweet on Sanjay Raut Video nmp)



राऊतांच्या जामिनाचं भवितव्य अजूनही अधांतरी


तर दुसरीकडे ईडीनं जामिनाच्या निर्णयाला विरोध केलाय. ईडी हायकोर्टात या निर्णयाला आव्हान देणार आहे. तसंच हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीनं पीएमएलए कोर्टाला केलीय. यावर जेवणानंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊतांच्या जामिनाचं भवितव्य अजूनही अधांतरी आहे.