Sanjay Raut ED Inquiry  : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणात (Patrachawl Scam) ईडीचे (ED) अधिकारी सकाळी सव्वासात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या घरात चौकशी करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, संजय राऊत यांच्या समोर आणखी अडचण वाढली आहे. ऑडिओ क्लिप प्रकरण संजय राऊत यांना भोवण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांना धमकी आणि शिविगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे. काल पोलिसांनी या प्रकरणात एनसी दाखल केली होती. आज संध्याकाळपर्यंत ही एनसी एफआयआरमध्ये परीवर्तित केली जाईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. 


स्वप्ना पाटकर यांना शिविगाळ केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे. व्हायरल ऑडिओ क्लिप सादर करत पीडित महिलेने पोलिसांमध्ये राऊतांविरोधात तक्रार दिली होती. 


संजय राऊत यांच्यावर महिलेने गंभीर आरोप केलेत. या महिलेची संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. या क्लिपमध्ये शिवीगाळ करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून संजय राऊतच आहेत, असा आरोप हा पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील चौकशीसाठी संजय राऊतांना बोलावू शकतात. यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.