Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ
संजय राऊत यांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. त्यांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणात राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण वाकोला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा आता दखलपात्र गुन्ह्यात वर्ग केला आहे. काल अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. मात्र आता संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vakola Police Station registered FIR on complaint of Swapna Patker. Threat & Audio Clip)
संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर आज वाकोला पोलीस ठाण्यात जावाब नोंद करण्यासाठी आल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती अशा प्रकारची लेखी तक्रार त्यांनी पोलिसांना केली होती.संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीची धाड पडली. त्यानंतर संजय राऊत हे सहकार्य करत नसल्याने त्यांना ईडीने ताब्यात घेतलं आणि ईडीच्या कार्यालयात आणलं. त्यांची अजूनही चौकशी सुरु आहे.
संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेऊन आता पाच तास झाले आहेत. तर एकूण 14 तास चौकशी झाली आहे. संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजून कायम आहे.
ईडीच्या सूत्रांच्या माहिती नुसार जर संजय राऊत यांनी चौकशीसाठी सहकार्य केले तर पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल नाहीतर त्यांना अटक होऊ शकते. आज संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त केले आहेत अशी माहिती देखील पुढे आली आहे.