नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपमधील वाद अधिक वाढताना दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आला होता. याला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पीएमसी घोटाळ्याबाबत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्यावर आरोप केला होता. हा त्यांचा आरोप राऊत यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, मानहानीबाबत राऊत हे चंद्रकांत पाटील यांच्यावर दावा ठोकणार आहेत. तशी माहिती राऊत यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपानंतर आता संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. पीएमसी घोटाळ्याबाबत आरोप करत चंद्रकांत पाटील यांनी आपली मानहीनी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सव्वा रूपयांचा दावा ठोकणार असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना चिमटा काढला आहे. संजय राऊत यांनी मानहानीची रक्कम थोडी वाढवावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.


चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्र पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला आहे.  


 चंद्रकांत पाटील यांनी  पाठवलेल्या पत्रात काही दळभद्री आरोप केले आहेत आमच्यासंदर्भात. पीएमसी बँक आणि अमूक बँक. त्याबाबत मी चंद्रकांत पाटलांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर दावा करणार आहे. इतर लोकं लावतात 100 कोटी, 50 कोटी असा दावा करणार नाही. सव्वा रुपयांचा दावा लावू. त्यांची तेवढीच त्यांची ताकद आहे.  त्यांच्याकडे तेवढेच आहेत. सव्वा रुपयावाले आहेत. ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा असतो, असा चिमटाही त्यांनी काढला.